मुंबई – येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा खास सोहळा साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. आता या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य मोहिमेत बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्साहाने सहभागी होत आहेत आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या प्रोफाईलवर तिरंग्याचे छायाचित्र टाकत आहेत.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होताना तिरंग्याचे छायाचित्र आपल्या प्रोफाईलवर टाकत त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले की, ‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.
आज़ादी के 75 साल का अमृत महोत्सव मनाने का वक्त आ गया है। गर्व से, शान से #HarGharTiranga लहराने का वक्त आ गया है।🇮🇳
— Akshay Kumar (@akshaykumar) August 2, 2022
आर. माधवन
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत असताना त्या लोकांचे बलिदान आपण विसरता कामा नये. ज्यांनी आपला झेंडा उंच ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आपण आपला तिरंगा घरी आणूया आणि तो अभिमानाने फडकावूया.अशा आशयाची पोस्ट आर माधवनने केली आहे.
As we enter the 75th year of our independence, we must not forget the sacrifices of those who laid down their lives to keep our flag high. To keep their memories alive, let’s bring home our Tiranga & proudly fly it from 13-15 Aug #HarGharTiranga https://t.co/0y963I9SBa
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) August 1, 2022
महेश बाबू
तेलगू सुपरस्टारने आपल्या ट्विटरवर लिहिले की, “आमचा तिरंगा… आमचा अभिमान. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घराघरात आपला तिरंगा सदैव उंच ठेवू, अशी शपथ घेऊया.
Our Tiranga.. our pride! Let’s pledge to keep our tricolour flying high! #HarGharTiranga from 13th-15th August 2022! https://t.co/jRL48t8iaw pic.twitter.com/5lOlITxqIr
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) August 1, 2022
अनुपम खेर
अभिनेते अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिरंगा दिसत आहे, ज्यातून त्यांनी ‘हर तिरंगा’च्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सर्व सोशल मीडियावर तिरंगा डीपी ठेवत हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानंतर अनेकांनी आपल्या प्रोफाइलला तिरंगा ठेवल्याचे दिसून आले होते.