नवी दिल्ली – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश मिळत असतानाच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मूल्य वाढत असल्यामुळे भारतीय सराफात सोमवारी सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर सोमवारी 195 रुपयांनी कमी होऊन 51,947 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दरही 223 रुपयांनी कमी होऊन 58,731 रुपये प्रति किलो पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,764 डॉलर व चांदीचा दर 20.21 डॉलर या पातळीवर होता. एचडीएफसी या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रुपया वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरावर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून आले.