मलपुरम – सोन्याच्या अंगठीमध्ये हिरे बसवणे एक सर्वसामान्य गोष्ट आहे अनेकांना अशी हिरेजडीत अंगठी आवडते पण अशाच एका छोट्या अंगठीत तब्बल 24 हजार पेक्षा जास्त छोटे हिरे बसवण्याची कमाल एका कलाकाराने केली असून या कलाकृतीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून या विक्रम पुस्तकात याची नोंद झाली आहे केरळमधील मलप्पुरम शहरात हा विक्रम करण्यात आला असून टच ऑफ एमी नावाच्या या अंगठी मध्ये तब्बल चोवीस हजार 679 छोटे हिरे बसवण्यात आले आहेत.
भारतात हिऱ्याचे दागिने बनवण्यामध्ये आघाडीची कंपनी असलेल्या डीडब्ल्यूए या प्रख्यात कंपनीने ही विक्रमी अंगठी तयार केली आहे नाशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मध्ये शिक्षण घेऊन तयार झालेल्या रितिषा नामक एका तरुणीने ही अंगठी तयार केली असून त्यासाठी तिला 90 दिवसाचा कालावधी लागला आयस्टर मशरूम पासून या अंगठीच्या डिझाइनची प्रेरणा घेण्यात आली होती प्रारंभी या अंगठीमध्ये 12300 हिरे बसवण्यात येणार होते.
पण जसे काम वाढत गेले तसतसे हिऱ्यांची संख्या दुप्पट झाली यापूर्वी उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील हर्शित बंसल नावाच्या एका ज्वेलरने छोट्या अंगठी मध्ये 12000 पेक्षा जास्त हिरे बसवून गिनीज बुक मध्ये नोंद केली होती त्याचा हा विक्रम या नव्या अंगठीने मोडला आहे हिऱ्याच्या दागिनामध्ये जगात बेल्जियमचा क्रमांक प्रथम आहे पण हा विक्रम भारताच्या नावावर नोंदवण्यात गेल्याचा आनंद असल्याचे कंपनीच्या संचालकांनी म्हटले आहे.