मुंबई – सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॅन इंडिया फॉर्मचा खूप प्रचार केला जात आहे. विशेषत: बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दरी भरून काढली जात आहे. आता जिथे बॉलीवूड कलाकार साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात तिथे साऊथचे कलाकारही झपाट्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहेत.
रश्मिका मंदान्नाच घ्या. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे तिची बॉलिवूडमधील क्रेझही वाढली आहे आणि त्यामुळेच ती आता हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवणार आहे.
‘सीता रमण’ चित्रपटाचा लूक आऊट
रश्मिकाच्या आता तिच्या आगामी ‘सीता रमण’ चित्रपटाचा लूक ईदच्या दिवशी रिलीज केला आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी ‘सीता रमन’ चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पोस्टरमधील रश्मिकाची व्यक्तिरेखा पाहून या चित्रपटाकडे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘सीता रमण’ असून रश्मिका लाल हिजाबमध्ये दिसली आहे.आपल्या ऑफ्रिन या पात्राची चाहत्यांना ओळख करून दिली आहे.
या चित्रपटात रश्मिकासोबत साऊथ स्टार दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर देखील दिसणार आहेत. दुल्कर एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर मृणाल त्याच्या लेडी लव्हच्या भूमिकेत दिसणार आहे.
रश्मिका मंदान्नाच्या बॉलिवूड एंट्रीबद्दल बोलायचे झाले तर ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. टायगर श्रॉफसोबत एक चित्रपट साइन केल्याचीही बातमी आहे. रश्मिका करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्येही दिसणार आहे.