पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी (दि. 14) देहू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात ड्रोन, पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, मायक्रोलाइट एअरोप्लेन अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे हे आदेश दिले आहेत. हे आदेश 14 जून रोजी मध्यरात्री बारा पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.