बीजिंग – मागील दोन वर्षांपासून चीनचा जगाला चांगलाच परिचय झाला आहे. त्याला कारण आहे चीन मधील हुवान शहरामधून तयार झालेला कोरोना विषाणू. यामुळे चीनची जगाला नवीन ओळख झाली, अर्थातच चीन देशाच्या संबंधित जगातून वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता पुन्हा एकदा चीन चर्चेत आला आहे. त्यांचे अध्यक्ष शी जिनपिंग हे एका आजराने ग्रासले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही त्याआजारावर ते पारंपरिक औषध उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
या औषधांच्या वापरामुळे मेंदूमधील रक्तपेशीं नरम होत असल्याचे सांगण्यात येते. त्यांना सेरेब्रल एन्यूरिजमने घेरले आहे . अश्या व्यक्तीच्या मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होतात. 50 वर्षांपर्यंत अधिक वयाचे लोक किंवा उच्च रक्तदाब, आनुवंशिक आजार, संसर्ग किंवा डोक्याला ईजा आणि तणावग्रस्त लोकांना या आजाराला तोंड द्यावे लागते.
हा आजार मेंदूच्या कुठल्याही भागात होऊ शकतो. तीव्र डोकेदुखी, हातपाय बधिर होणे, सातत्याने थकवा आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.या व्यतिरिक्त जिनपिंग यांच्या आरोग्यावरून दीर्घकाळापासून कयास वर्तविण्यात येत आहेत. त्यांनी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या पूर्वी कोरोना लाट संपल्यावरही विदेशी नेत्यांची भेट घेणे टाळले होते. त्यानंतर ते आजारी असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
अर्थव्यवस्थेवरून चिंतेत जिनपिंग
मागील काही काळापासून चिनी अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. युक्रेन युद्धामुळे चीनमध्ये गॅस आणि इंधनाच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. तर झिरो कोविड धोरणामुळे अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. या सर्व कारणांमुळे जिनपिंग मोठय़ा तणावात आहेत. हा तणाव देखील त्यांच्या आजाराचे एक प्रमुख कारण असू शकते.