फ्लोरीडा – जागतिक मुष्टियोद्धा व माजी विजेता खेळाडू माईक टायसन याच्या रागाचा फटका विमान प्रवासासाठी दाखल झाल्याच्या दरम्यान एका सहप्रवासी व्यक्तीला बसला. टायसनची इच्छा नसताना त्याच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेलल्या व्यक्तीला टायसनने ठोसे मारुन जखमी केले. यानंतर विमानातील क्रुसह अन्य काही व्यक्तींनी टायसनला त्याच्यापासून दूर नेले. मात्र, टायसनचा राग इतका अनावर झाला की त्याने संतापाच्या भरात आपला प्रवास रद्द करत विमानातून खाली उतरणे पसंत केले.
टायसन हा त्याच्या रागीट स्वभावासाठी कुख्यात आहे. टायसन फ्लोरिडाला विमानाने रवाना होणार होता. मात्र, तो त्याच्या सीटवर बसल्यावर लगेचच सहप्रवाशी असलेल्या एका व्यक्तीने त्याच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न केला. टायसनला त्याच्याशी बोलण्याची किंवा संवाद साधण्याची इच्छा नव्हती. तरीही तो व्यक्ती आपला हेका सोडयला तयार नव्हता.
अखेर टायसन संतापला व त्याने रागाच्या भरात या व्यक्तीला इतके ठोसे मारले की तो जखमी झाला, त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. यावेळी क्रु सदस्यांनी अन्य प्रवाशांसह हे भांडण सोडवले. परंतू टायसनने अपला प्रवासाच बेत रद्द केला व विमानातून खाली उतरला. अमेरिकेतील पोलीस कात्याने या वृत्ताची पुष्टी केली असली तरी टायसनवर काही कारवाई होणार का ते अद्याप घोषित केलेले नाही. मात्र, टायसनने या प्रवाशाबाबत जे काही केले त्याचा व्हिडीओ विमानातील एका व्यक्तीने काढला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
This guy wins the award for most annoying passenger on a flight for Mike Tyson to do this! 😬pic.twitter.com/UA4RiYMzXW
— Chamatkar Sandhu (@SandhuMMA) April 21, 2022
1997 साली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असताना आपला प्रतिस्पर्धी इव्हेंडर होलीफिलडचा एका लढतीदरम्यान कान चावला होता. तसेच त्याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपात तुंरुंगाची हवाही खावी लागली होती. केवल हेच नव्हे तर अंमली पदार्थांचे सेवन करणे तसेच हे पदार्थ बाळगणे अशा विविध गुन्ह्यात त्याला अनेकदा तुरुंगात जावे लागले आहे. 1996 सालापासून त्याने आजवर कोणतीही स्पर्धा जिंकलेली नसून 1997 साली झालेल्या होलीफिल्डविरुद्धच्या स्पर्धेनंतर तो खेळातील कामगिरीपेक्षा वादांतच जास्त अडकला होता.