नांदेड – नांदेड शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बियाणी गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने नांदेड शहर हादरून गेले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नांदेड हादरले; फायरींगनंतर व्यावसायिक संजय बियाणींचा उपचारादरम्यान मृत्यू, घटनेचा व्हिडिओ समोर#nanded #sanjaybiyani #murder pic.twitter.com/In5JzdEsxS
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 5, 2022
संजय बियाणी हे कामानिमित्त घराबाहेर पडत होते. दरम्यान अचानक दुचाकीवर दोन अद्यात व्यक्ती आले व त्यांनी बियाणी यांच्या दिशेने 4 गोळ्या झाडल्या. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियानी यांच्या निवास्थानजवळ शारदा नगर येथे घडला. या गोळीबार बियाणी गंभीर जखमी झाले होते दरम्यान त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
गोळीबाराची ही घटना कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे व हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यात आता ही घटना घडली आहे.