मुंबई – सुपरस्टार यशच्या आगामी “केजीएफ चॅप्टर-2′ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागलेली आहे. काही दिवसांपूर्वीच “केजीएफ चॅप्टर-2′ दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, फॅन्सने ट्रेलरला मोठी पसंती दिली आहे.
“केजीएफ चॅप्टर-2′ मध्ये बॉलिवूडचा मुन्ना भाई म्हणजेच, अभिनेता ‘संजय दत्त’ मुख्य व्हिलनची भूमिका रंगवणार आहे. ‘अधिरा’ असे या पात्राचे नाव असून, यासाठी संजय दत्तने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संजू बाबाने सडक, खलनायक, वास्तव, साजन ते मुन्नाभाई अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट पात्रे रंगवली.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये असं दिसून येत की… अधीरा वाट्टेल ते करायला तयार आहे आणि रॉकीशी लढण्यासाठी त्याच्या सैन्याला आदेश देतो. संजय दत्तला अधीराच्या भूमिकेत पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
लांब पोनीटेल, लाल डोळे, अंगावर अनेक टॅटू ,जड चिलखत या भीतीदायक रूपात दिसतोय. या मध्ये संजय दत्तची संपूर्ण मेहनत आपल्याला दिसून येत. चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याला दररोज 25 किलोचे चिलखत घालून शूटिंग करावे लागले आहे. “केजीएफ चॅप्टर-2′ हा बहुचर्चित चित्रपट येत्या 14 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.