पुणे – तीव्र उन्हामुळे त्वचा, केस यांच्याशिवाय डोळ्यांवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचा आणि केस यापेक्षा अधिक महत्त्वाचा डोळा हा अवयव आहे. उन्हाची तीव्रता वाढत जाते तसेच डोळ्यांचे विकार डोके वर काढू लागतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचेचे असते. उन्हाळ्यात जमीनीची धूप वेगाने होते. त्याची धूळ हवेने हवेत पसरतात.
या काळात बऱ्याचदा वादळांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे हवेत पसरलेले धुलीकण डोळ्यात जातात आणि मातीमुळे डोळ्यांचे आजार होतात. डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाजणे असा त्रास होऊ शकतो.
ओझोनचा स्तर कमी झाल्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्रास हल्ली अधिक होतो. ही किरणे डोळ्यांसाठी अधिक हानीकारक आहेत. त्यातून उन्हाळ्यात त्यांची तीव्रता अधिक जाणवते म्हणूनच डोळ्यांचे लायमोफोमा, मेलानोमा हे आजार होऊ शकतात.
उन्हात संरक्षणासाठी काय कराल?
– तीव्र उन्हात जाण्याआधी गॉगल वापरा.
– डोळ्यांना थंडाव्यासाठरी बटाटा, काकडीचे काप
– गुलाबजलातील कापसाचा बोळा झोपताना डोळ्यांवर ठेवावा.
– भरपूर पाणी पिणे टोपीचा वापर