पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी राज्यभर तिथीने जयंती साजरी केली आजच्या आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर मधील किल्ले शिनेरीवर मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले आहे. यावेळेस किल्ले शिवनेरीवर शिवकालीन पालखीचे आगमन झाले.
दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ‘अमित ठाकरे’ व आमदार ‘राजू पाटील’ हे देखील आज छत्रपतींचा आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत. यावेळी अमित राज ठाकरे यांच्या हस्ते महाअभिषेक आणि पूजन करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की.., ‘हा माझा राजकीय दौरा नाही, फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय’. असं अमित ठाकरे म्हणाले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान आणि तेजस्वी पुत्र व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. असे संदर्भ इतिहासात मिळतात.