उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर प्रथमच ‘योगी आदित्यनाथ’ त्यांच्या मतदारसंघात आले ते थेट होळी सेलिब्रेशनसाठी. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका छोट्या रथामधून लहानसा रोड-शो केला असून, योगींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
रोड-शो दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अगदी डोळ्यावर गॉगल लावूं नागरिकांना अभिवाद केलं. यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण देखील करण्यात आली. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो तुफान व्हायरल झाले असून, त्यांच्या या हटके स्टाईलची चांगलीच चर्चा होत आहे.
यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भक्त प्रल्हादाची पुजाही करण्यात आली. स्थानिकांनी योगी आदित्यनाथ यांना खेळण्यातील बुल्डोझर भेट दिला. अतिक्रमणविरोधी धडक मोहीमांसाठी योगी सरकार प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्यांना हा बुल्डोझर भेट देण्यात आलाय.