बेंगळुरू – ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पीन गोलंदाज शेन वॉर्न हा केवळ एक गोलंदाज नव्हता तर तो फिरकीचा जादुगार होता. ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटलेले सामनेही त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघाला जिंकून दिले. या महान गोलंदाजाला व माझ्या मित्राला मी आदरांजली वाहतो, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार व लेगस्पीन गोलंदाज अनिल कुंबळे याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
वॉर्नचा मित्र असलेल्या कुणालाही ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या स्लेजिंगचा सामना करावा लागला नाही. मी या गोष्टीचा स्वत: अनुभव घेतला आहे, असेही कुंबळे म्हणाला.