पुणे : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमनचा जन्म 5 फेब्रुवारी, 1970 मध्ये झाला. लेहमनने ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक म्हणून दमदार कामगिरी करत संक्रमणाच्या कठीण टप्प्यानंतर ऑस्ट्रेलियाला गतवैभव प्राप्त करुन दिले.
त्याच्या काळात, लेहमन हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज होता आणि त्याने ऑस्ट्रेलियासाठी 27 कसोटी आणि 117 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो 1999 आणि 2003 अशा दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्यार्या ऑस्ट्रेलियान संघाचा प्रशिक्षकही होता.
डॅरेन लेहमच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्धलच्या काही खास गोष्टींवर या लेखातून प्रकाश टाकणार आहोत.
1) होल्डन मोटार कंपनीत मजूर म्हणून काम
डॅरेन लेहमन वयाच्या 16 व्या वर्षी असेंबली लाईनवर काम करण्यासाठी होल्डन कार उत्पादक कंपनीत रुजू झाला होता. या दरम्यान त्याला दर आठवड्याला सुमारे 250 ऑस्ट्रेलियन डॉलर इतका पगार होता. त्याचे या कारखान्यातील कामावर इतके प्रेम होते की त्याने कामासाठी ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सलन्स संघात झालेली निवड नाकारली.
2) लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा निस्सिम चाहता
डॅरेन लेहमन प्रीमियर लीग क्लब लिव्हरपूलचा निस्सिम चाहचा आहे. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अपमानास्पद अॅशेस पराभवानंतर काही तासांनंतर, लेहमनन लिव्हरपूल आणि स्टोक यांच्यातील प्रीमियर लीग सामन्याचे तिकिट मिळण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे ऑस्ट्रेलियन चाहते संतप्त झाले, जे अजूनही ऍशेसमधील पराभव आणि मायकेल क्लार्कच्या निवृत्तीमुळे संतप्त झाले होते. मुख्य प्रशिक्षक असताना त्याच्याकडून अशा प्रकारची अवहेलना अपेक्षित नव्हती. असे मत अनेक ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी व्यक्त केले. या घटनेवरुन लेहमनचे लिव्हरपूलवर किती प्रेम होते हे लक्षात होते.
3) बूफ टोपणनावामागची गोष्ट
जॉनी गियानेटो हा लेहमनचा बालपणीचा मित्र आहे. दोघेही लहाणपणी गॉलर सेंट्रलकडून फुटबॉल खेळले होत. जॉनी गियानेटो लेहमनला त्यांच्या हायस्कूलच्या काळात बुफ हे टोपणनाव दिले. जॉनी हा ग्रीक आहे (तो खरे तर इटालियन आहे) असा विचार करून लेहमनने त्याला ’द गोल्डन ग्रीक’ म्हटले तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानावर मजा करत होते. यावर जॉनीची तात्काळ ’बूफहेड’ अशी प्रतिक्रिया आली
बूफहेडचा अर्थ ऑस्ट्रेलियन भाषेत मोठ्या डोक्याचा, साधा मनाचा किंवा कधीकधी थोडा मूर्ख व्यक्ती असा होतो. ’बूफहेड’ हे ऑस्ट्रेलियन संस्कृतीत सामान्यतः वापरले जाणारे टोपणनाव आहे.
4) संघ सहकार्याच्या बहिणीशी विवाह
डॅरेन लेहमन इंग्लंडमधी यॉर्कशायर या कौटी क्रिकेट संघाचा भाग होता, जिथे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रेग व्हाईट त्याचा सहकारी होता. तिथेच त्याची भेट क्रेग व्हाईटची बहीण अँड्रियाशी झाली, जिने 1999 मध्ये लेहमनशी लग्न केले. लेहमनला त्याच्या भावी पत्नीला आपण क्रिकेटपटू असल्याचे पटवून देणे कठीण गेले होते. त्यानंतर व्हाईट आणि लेहमन यांनी आपापल्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना केला.
5) खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक विजेतेपद
डॅरेन लेहमनने 1999 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदात लेहमनची फार छोटी भूमिका होती. त्याने आठ डावात केवळ एका अर्धशतकासह 136 धावा केल्या.
2003 च्या विश्वचषकात लेहमनने 8 डावात दोन अर्धशतकांसह 224 धावा केल्या होत्या. चेंडूसह, त्याने सात डावात सहा विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने त्यांचा विश्वचषक यशस्वीपणे राखला आणि या प्रक्रियेत तीनदा विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.
जून 2013 मध्ये, लेहमन इंग्लंडमधील ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक बनले. दोन ऍशेस विजयांव्यतिरिक्त, लेहमनच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मायभूमीवर 2015 चा विश्वचषक जिंकला होता. त्या विजयासह, लेहमन हा खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला.