साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. एवढेच नाही तर या चित्रपटातील गाणीही रसिकांमध्ये लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे. आता प्रत्येकाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुन नाही तर त्याच्या कुटुंबातील ५ लोकांबद्दल सांगणार आहोत, जे चित्रपट जगताशी निगडित आहेत आणि ज्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या
अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या अभिनयासोबतच कॉमिक टायमिंगनेही रसिकांना भुरळ घातली होती. त्यांनी हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अल्लू रामलिंगय्या यांच्या पाच मुलांमध्ये अल्लू अरविंद आणि सुरेखा हे सर्वात लोकप्रिय झाले.
अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद
अल्लू अरविंद हे अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील आहेत. ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहराही आहेत. अरविंद हे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरीष
अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याचा भाऊ अल्लू शिरीष हा देखील दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेता आहे. त्याने 2013 मध्ये ‘गौरवम’ चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.
अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी
अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते आहेत. चिरंजीवीचे लग्न अल्लू अर्जुनची मावशी सुरेखाशी झाले आहे. चिरंजीवीची फॅन फॉलोइंग जोरदार आहे.
अल्लू अर्जुनचा चुलत भाऊ राम चरण
अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा देखील दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने देखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. राम चरणने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.