नाशिक – नाशिक येथील मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात नाशिक-औरंगाबाद रोडवर झाला आहे.
या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बस घेऊन जात होती. दरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवर बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यानंतर बस पलटी झाली. यामध्ये 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर बस चालक पसार झाला आहे.अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.