मुंबई – सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली होती. सत्र न्यायालयाने आज यावर निकाल दिला. आता नितेश राणे यांनी सरेंडर करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. सरेंडर करण्यासाठी मी न्यायालयासमोर जातोय, असं भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात ते हजर झाले आहेत.
दरम्यान, शरणागती पत्करण्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी या सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे प्रयत्न केले होते. आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत मी शरणागती पत्करत आहे, असं म्हटलं होतं.
कोण आहेत सतोष परब ?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते. 18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.