दुबई – भारतीय व्यावसायिकाने ब्लॅकमेलिंग करुन स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी दबाव आणल्याचा खुलासा व आरोप झिम्बाब्वेचा करिकेटपटू ब्रेंडन टेलरने केला होता. मात्र, इतकी गंभीर गोष्ट धगल्यावरही तो इतके दिवस का गप्प होता, असा सवाल आयसीसीने केला आहे. अर्थात त्याला पाठींबा देताना या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाइल, असेही सांगितले आहे.
माझ्यावर आयसीसीने बंदी लावली असली तरीही त्यावर माझा आक्षेप नाही पण माझ्याबाबत जे घडले ते मला सांगण्यास विलंब झाला हे मान्य करतो. त्यावेळी खूप निराशाजनक मानसिकतेतून जात होतो. मला स्पॉट फक्सिंग करण्यासाठी 15 हजार डॉलर रकमेचे आमिषही दाखवले गेले होते.
भारतातील एका हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाने मला आमंत्रीत केले होते. तेथे मला ड्रग्जही दिले. मी देखील या ड्रग्जचे सेवन केले. त्यानंतर सकाळी तोच व्यावसायिक माझ्या रुममध्ये आला व स्पॉट फिक्सिंग कर अन्यथा तूझा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करीन अशी धमकीही दिली व ब्लॅकमेलही केल, असा गौप्यस्फोट टेलरने केला होता.
भारतातून मायदेशी परतण्यासाठी मी ते पैसे घेतले पण स्पॉट फिक्सिंग केले नाही. मात्र, या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला व अखेर मी आयसीसीशी संपर्क केला व सर्व काही सांगितले, असेही टेलर म्हणाला.
टेलरने झिम्बाब्वेकडून 2004 साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याने 205 एकदिवसीय सामन्यांत 11 शतकांसह 6 हजार 684 धावा केल्या आहेत. त्याने 34 कसोटीत 2 हजार 320 धावा आणि 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 934 धावा केल्या आहेत.
नाव घेऊन सर्व जाहीर करावे
टेलरने या सर्व बाबतीत संपर्क करण्यास विलंब केला असला तरीही आता तपास केला जाइल व चौकशीही केली जाइल, असे आयसीसीने म्हटले आहे. मात्र, टेलरने या सर्व प्रकरणात कोण गुंतले आहेत त्यांची नावेही जाहिर केली पाहीजेत, असेही त्याला सुचीत करण्यात आले आहे.