अहमदाबाद – गुजरातची 16 वर्षीय बॅडमिंटनपटू तसनीम मीरने अंडर-19 महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचा विक्रम केला आहे.
ज्युनिअर गटात खेळताना सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासमवेत अनेक स्टार महिला बॅडमिंटनपटूंना हा पराक्रम करता आला नव्हता. ( Tasnim Mir becomes first Indian to claim world no. 1 status in u-19 girls singles ) तसनीम मात्र असा पराक्रम करणारी पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
ज्युनिअर गटाची जागतिक क्रमवारी 2011 साली सुरू झाली. त्यावेळी सायना या गटात पात्र नव्हती तर सिंधूचा सर्वोत्तम क्रमांक दुसरा होता.
तसनीम मीर म्हणाली, मी खुप आनंदी आहे. पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याप्रमाणेच देशाचं नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. वरिष्ठ गटात भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी माझा सराव करत आहे, असे तिने सांगितले.