कॉलेविल (अमेरिका), – अमेरिकेतील टेक्सास प्रांतात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या ओलीस नाट्यामुळे तणाव निर्माण झाला होता. एका सभास्थानी या बंदुकधाऱ्याने चार जणांना ओलीस ठेवले होते. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या पाकिस्तानी न्युरोसर्जनच्या सुटकेसाठी या बंदुकधाऱ्याने हे ओलीसनाट्य केले होते.
या सभास्थानी एका व्यक्तीला शनिवारीच ओलीस ठेवण्यात आले होते. कॉलिवेलमधील इस्रायली सभागृहामध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर ओलीस ठेवलेल्या या व्यक्तीला मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर रात्री 9.28 वाजता एफबीआयच्या स्वात पथकाने या इमारतीमध्ये प्रवेश केला.
यानंतर झालेल्या चकमकीमध्ये हा बंदुकधारी मारला गेला आणि उर्वरित तिन्ही ओलीसांची सुटका करण्यात आली, असे टेक्सास येथील एफबीआय स्पेशल एजंट मॅट डीसामोने सांगितले. गोळीबाराच्या या घटनेचा तपास केला जाणा आहे, असे या एजंटनी म्हटले आहे.
हा हल्लेखोर ज्यू समाजाशी घडामोडींशी थेट संबंधित होता. मात्र तो एखाद्या व्यापक कटाचा भाग होता की नाही, हे समजू शकलेले नाही. या हल्लेखोराने या ओलीस नाट्यासाठी ज्यू सॅंगोंगचाच वापर का केला हे समजू शकले नाही. सभागृहामध्ये तो धार्मिक
कोण आहेत या आफिया सिद्दीक…?
पाकिस्तानी न्यूरोसर्जन आफिया सिद्दीक या अल कायदाशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्या अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरवल्या गेल्या आहेत. सिद्दीक या सध्या टेक्सासमधील फेडरल कारागृहाक आहेत. सिद्दीक यांच्या सुटकेसाठी हे ओलीस नाट्य करणाऱ्या बंदुकधाऱ्याची ओळख पटली आहे. मात्र तपास सुरू असल्याने त्याची ओळख उघड करण्यात येणार नसल्याचे एफबीआयच्या एजंटांनी म्हटले आहे.
चौकट
वृत्तवाहिनीच्या व्हिडीओतील थरार
सभागृहातील काही व्यक्ती घाबरुन बाहेर पळताना आणि त्यानंतर एका बंदुकधारी व्यक्तीने लगेच दरवाजा बंद करून घेतल्याचे स्थानिक वृत्तवाहिनीच्या व्हिडीओमध्ये दिसले होते. त्यानंतर लगेचच बंदुकीच्या काही फैरी झाडल्याचे आवाज ऐकू आले. मात्र या फैरी कोणी झाडल्या हे समजू शकले नाही.