२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचे नाते सध्या चर्चेत आहे.अलीकडेच अभिनेत्रीचा सुकेशसोबतचा लव्हबाईटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर जॅकलीनने मीडिया आणि चाहत्यांना हा फोटो व्हायरल न करण्याचे आवाहन केले होते. या सर्व घटनांनी जॅकलीनचा आनंद हिरावून घेतला असून आता जॅकलीन पुस्तके वाचून स्वतःला तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी समोर आली आहे.
अध्यात्मिक पुस्तके वाचत आहे जॅकलिन
रिपोर्ट्सनुसार, या सगळ्याचा सामना करण्यासाठी जॅकलिन अध्यात्माचा आधार घेत आहे. ती आजकाल अध्यात्मिक पुस्तके वाचत आहे. जॅकलिन स्वतःला तणावापासून दूर ठेवण्यासाठी खूप मेडिटेशन देखील करत आहे. एवढेच नाही तर ती लुई एल हे यांची पुस्तके वाचताना दिसली. जे तणावातून मुक्त करण्यासाठी मदत करणारी आहेत.
काही दिवसांपूर्वी जॅकलिन आणि सुकेशचा खाजगी फोटो लीक झाला होता. त्यानंतर जॅकलिनने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लिहिले, ”हा देश आणि तेथील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडियातील मित्रांचा समावेश आहे, ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी सध्या कठीण काळातून जात आहे, पण मला खात्री आहे की माझे मित्र आणि चाहते मला यावर मात करण्यासाठी मदत करतील.”
जॅकलीनने पुढे लिहिले की, ”मी माझ्या मित्रांना विनंती करेन की, माझ्या गोपनीयतेवर परिणाम करणारा असा कोणताही फोटो व्हायरल करू नये. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी असे करणार नाही मला खात्री आहे की तूम्ही माझ्यासोबत सुद्धा असे करणार नाही. आशा आहे की न्याय आणि चांगली भावना प्रबळ होईल. धन्यवाद.”