हडपसर – प्रभाग २५ मधील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ते, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन, सुशोभीकरण आदी विकास कामे केली आहेत. याशिवाय अद्ययावत शाळा, उद्यान, रुग्णालय आणि नाला सफाई व गार्डन त्यामुळे प्रभागाचा कायापालट होत आहे.प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी नेहेमीच कटिबद्ध आहे,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
नगरसेवक प्रशांत जगताप व नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्या प्रयत्नातून व विकास निधीतून वानवडी प्रभाग क्रमांक २५ मध्ये केदारी वस्ती ते केदारी पेट्रोल पंप २४ इंची ड्रेनेज लाईन टाकणे , परिसरातील विद्युत विषयक अनेक कामे, अनुसया एनक्लेव सोसायटी ते चॉईस मिनी मार्केट, जगतापनगर या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम, कुमार कुंज सोसायटी जवळ ६ इंची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, रवि पार्क सोसायटी मागील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे असा विविध विकास कामाची सुरुवात करण्यात आली आहे.त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जगताप बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप जगताप, प्रफुल्ल जांभुळकर, केविन मॅन्युअल, अमोल बाचल, शंभूसिंह शिंदे, संजय भोसले, सागर पासलकर, राकेश परदेशी, संजय परदेशी, विष्णू सनके, दीपकभाऊ केदारी, उदय चव्हाण, अनिल सावंत, शैलेश गायकवाड, विठ्ठलअण्णा केदारी, दिनेश गिरमे, अविनाश ढोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.