नवी दिल्ली – आयुष मंत्रालय दिनांक 14 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर 75 लाख लोकांसाठी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या उत्तर गोलार्धातील भ्रमणास प्रारंभ करतो, या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि आनंद दिल्याबद्दल निसर्ग जननीचे आभार मानण्याचा दिवस आहे.
या दिवशी,सर्व सजीवांचे पालनपोषण करणाऱ्या सूर्याला नमन करण्यासाठी ‘सूर्य नमस्कार’ घातले जातात. वैज्ञानिकदृष्ट्या, सूर्यनमस्कार रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आणि चैतन्यवृद्धीसाठी आवश्यक आहेत, सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचा संदेश देण्याचाही प्रयत्न असेल. आजच्या जगात जेथे हवामानविषयक जाणीव असणे अत्यावश्यक आहे, दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा (हरित ऊर्जा) मिळाल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल.