इंदापूर – इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय, इंदापूर येथे हळदीकुंकू कार्यक्रम गुरुवार (ता.१ रोजी) पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधिकारी उमा गिरीश शहा व अर्पिता आदित्य शहा उपस्थित होत्या.
मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे संस्कार आणि संस्कृती मिलनाचा अनोखा कार्यक्रम हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापासून अनभिज्ञ असलेल्या मुस्लिम महिला भगिनींना सहभागी करून त्यांना तिळगुळ व वाण देण्याचा अभिनव असा उपक्रम शाळेत घेण्यात आला.
शाळेच्या परिसरात आनंददायी वातावरणात विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी तसेच भारतीय परंपरा जोपासत हळदी-कुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत हिंदू महिलांना आणि परिसरातील सर्व पालकांना या कार्यक्रमात सहभागी करून हिंदू मुस्लिम ऐक्य भावना निर्माण झाली. सर्व महिलांनी वाण लुटले.
यावेळी परिसरातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्स्या, सर्व पालक, महिला भगिनी उपस्थित होत्या. शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.