न्युयॉर्क – भारतातील रिलायन्स कंपनीने विदेशात मालमत्ता विकत घेण्याकडे आपले सध्या लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत असून या कंपनीने नुकतेच न्युयॉर्क मधील एक महागडे हॉटेल विकत घेण्याचे निश्चीत केले आहे.
मॅनडारीन ओरियंट असे रिलायन्सने विकत घ्यायचे ठरवलेल्या पंचतारांकित हॉटेलाचे नाव आहे. त्यासाठी तब्बल 100 दशलक्ष डॉलर्सची किंमत मोजली जाणार आहे. मॅनहटन भागात हे हॉटेल आहे. कोलंबस सेंटर कॉर्प मार्फत हे हॉटेल विकत घेण्यात येत आहे.
मार्च महिन्यापर्यंत हा व्यवहार पुर्ण होणार आहे. या हॉटेलची प्रॉपर्टी अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या भागात आहे आणि अमेरिकेतील हे एक प्रतिष्ठीत हॉटेल मानले जाते. कंपनीने आपल्या इन्व्हेसटमेंट उपकंपनी मार्फत हा व्यवहार करायचे ठरवले आहे. आपल्या भागधारकांसाठी जारी केलेल्या निवेदनात कंपनीने ही माहिती दिली आहे.