चंडीगढ – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या कुटुंबातील काही जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी, मुलगी आणि सूनेला करोना झाला असून मुख्यमंत्री चन्नी यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
मोहालीचे सिव्हिल सर्जन आदर्शपाल कौर यांनी शनिवारी सांगितले, की मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डॉ. कमलजीत कौर, त्यांचा मुलगा नवजीत सिंग आणि सून सिमरनधीर कौर यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री चन्नी यांनी चंदीगड येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूरमधील कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे कारण सांगताना त्यांचे सचिव हुसन लाल आणि एका स्वीय सहाय्यक करोना पॉझिटीव्ह असल्याचं सांगितले होते. त्यामुळेच पंतप्रधानांना रिसीव्ह करायला भटिंडाला गेलो नाही, असे ते म्हणाले होते.
परंतु, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे बाहेर फिरतानाचे व्हिज्युअल्स व्हायरल झाले होते, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेले कारण खरे होते की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र आता खरे काय ते स्पष्ट झाले आहे.