नवी दिल्ली – करोना या विषाणू नंतर ओमायक्रॉन या विषाणूने सध्या जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रोन हा विषाणू पहिल्यांदा आढळून आला. करोनाचा हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरत आहे. त्यातच करोनासंदर्भात डेनमार्कच्या आरोग्यप्रमुख टायरा ग्रूव क्रॉस यांनी ओमायक्रॉनसह करोना महामारीचा अंत होईल, असं भाकीत केलं आहे.
पुढील दोन महिन्यात संपूर्ण जगामध्ये सध्या जी महामारी पसरली आहे तिचा अंत होईल. ओमायक्रॉन या विषाणूचा सुद्धा प्रभाव कमी होऊन आपण सगळे आपले आधीचे म्हणजे महामारी पूर्वीचे जीवन पुन्हा जगू शकतो, असं टायरा यांनी म्हटलं आहे.
एका मुलाखतीतटायरा यांनी सांगितलं, की एका ऑर्गनायझेशनच्या अभ्यासावरून असे लक्षात आले की ओमायक्रॉनचा प्रभाव हा डेल्टाच्या प्रभावापेक्षा निम्मा असून यामुळे अधिकाऱ्यांना नवीन उमेद मिळाली आहे. त्याचबरोबर डेन्मार्कमध्ये पुढील २ महिन्यात महामारीचा अंत होईल असे सुद्धा त्यांनी सांगितले
टायरा यांच्या विधाननुसार पुढील २ महिन्यात आपण महामारीतून मुक्त होऊ. तसेच या विषाणूच्या संक्रमनाचा वेग कमी होऊन आपण आपले सामान्य जीवन परत जगू शकू.
आर्हस यूनिवर्सिटी हॉस्पिटलमधील डिपार्टमेंट ऑफ इंफेक्शियस डिसीजचे प्रमुख लार्स ऑस्टेरगार्ड यांनी मात्र या विरुद्ध भाकीत केलं होतं. त्यांच्यानुसार करोना महामारीचा अंत असंभव आहे. परंतु करोनाचे संकट कमी होऊ शकते. त्यावरील वॅक्सिन आणि इंजेकशन्स लोकांपर्यंत पोचवून त्यांची इम्युनिटी वाढवायची, हाच उत्तम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.