चंदिगड – केवळ सहाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले पंजाबमधील आमदार बलविंदर सिंग लड्डी यांनी आता लगेच पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे पंजाबसाठीचे प्रभारी हरिष चौधरी आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या उपस्थितील लड्डी यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
हरगोबिंदपूरचे आमदार असलेले लड्डी यांनी कादियानचे आमदार फतेहगंज सिंग बाजवा यांच्या समवेत 28 डिसेंबरला नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाबसाठीचे प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.