नवी दिल्ली – सोमवारी चांदीचा दर तब्बल 342 रुपयांनी कमी होऊन 60,710 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात चांदीचा दर घसरल्यामुळे भारतीय बाजारातही चांदीचा दर घसरला असल्याचे दिसून आले.
सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर मात्र 18 रुपयांनी वाढून 47,175 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जागतिक बाजारात मात्र सोन्याचा दर थोडा वाढून 1,809 डॉलर व चांदीचा दर 22.75 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आणि महागाई वाढणार असल्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे भारतातही या दोन धातूचे दररोज अस्थिर राहण्याची शक्यता आहे.