बारामती – बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव तर उपाध्यक्षपदी रोहित घनवट यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी यांच्या नावाची घोषणा केली घोषणेनंतर बारामती सहकारी बँकेत सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
बारामती सहकारी बँकेची निवडणूक प्रथमच बिनविरोध करण्यात आली. त्यानंतर चेअरमन पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगर परिषदचे गटनेते सचिन सातव यांच्याकडे बारामती बँकेची धुरा सोपवली.