नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात वाढूनही भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मात्र घट नोंदली गेली.
रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याचे दिसून येते. दिल्ली सराफात सोन्याचा दर 142 रुपयांनी कमी होऊन 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम व चांदीचा दर 615 रुपयांनी कमी होऊन 60,280 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,799 डॉलर व चांदीचा दर 22.30 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.