थिम्पू – भूतान सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रक ग्यालपो हा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित केला आहे. भूतानच्या राष्ट्रीय दिनी हा पुरस्कार घोषित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून विशेषतः कोविड काळात पंतप्रधान मोदींनी भूतानला जी मदत केली त्याच्या कृतज्ञतेपोटी मोदींना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींना लवकरच हा पुरस्कार प्रत्यक्ष प्रदान केला जाईल. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. भारताने गेल्या काही वर्षांत भूतानला अनेक प्रकारचे सहाय्य केले आहे त्याबद्दल भूतानची जनता पंतप्रधान मोदींच्याप्रति कृतज्ञ आहे, अशी भावनाही भूतानी पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकौंटवर व्यक्त केली आहे.