मुंबई – मुंबईचे निलंबित पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या विरोधात खंडणी प्रकरणात पोलिसांनी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र गोरेगाव उपनगरात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधात आहे. त्यांच्या विरोधात खंडणीच्या एकूण पाच तक्रारी दाखल आहेत. परमवीर सिंह यांना राज्य सरकारने खंडणी वसुलीच्या आरोपावरून दोन दिवसांपूर्वीच निलंबित केले आहे. आज दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.
गोरेगाव उपनगरातील दोन बारवर छापे न मारण्याच्या बोलीवर परमवीर सिंह आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी विमल आगरवाल नावाच्या बार मालकाकडून 9 लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती. तसेच परमवीर सिंह यांनी बार मालकाकडून 2 लाख 92 हजार रुपयांचा मोबाइलही स्वीकारला होता. तो त्यांनी बार मालकाकडून जबरदस्तीने वसूल केला होता, असा आरोप आहे. जानेवारी 2020 ते मार्च 2021 या अवधीत हा प्रकार घडला आहे.