नवी दिल्ली : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशाच्या काही भागामध्ये ऐन हिवाळ्यात पावसाळ्या सारखा पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, चार दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
A total of 24 people lost their lives due to heavy rain in Karnataka. Crop damage at over 5 hectares of land.
As many as 658 houses were completely damaged while 8,495 homes were partially damaged. At least 191 livestock were reported dead: CMO— ANI (@ANI) November 22, 2021
आठवडाभरापासून कर्नाटकमध्ये पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पावसामुळे जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानही झालेय. जनजीवन विस्कळीत झालेय. जवळपास पाच लाख हेक्टर जमीनीवरील पिकं पाण्यात गेली आहेत. कर्नाटकमधील 658 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 191 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
ಇಂದು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ಮಳೆಯಿಂದ ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಹಲವು ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸಲಾಯಿತು.
ಸಚಿವರಾದ ಡಾ. ಕೆ.ಸುಧಾಕರ್ , ಆರ್.ಅಶೋಕ್ ಮೊದಲಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.@mla_sudhakar @RAshokaBJP pic.twitter.com/YnDZPBFu9z
— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 21, 2021
कर्नाटकमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी आढावा घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे, आतापर्यंत कर्नाटकमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
एक नोव्हेंबरपासून आतापर्यंत केलेल्या प्राथमिक नुकसान आणि नुकसानीच्या अंदाजानुसार, 658 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर 8,495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे, असे कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.