नवी दिल्ली, – दिल्ली शहर परिसरातील हवेची स्थिती आजही व्हेरी पुअर या वर्गवारीतच नोंदवली गेली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 377 इतका नोंदवला गेला.
गाझियाबाद, गुडगाव आणि नॉयडातील स्थितीही खराब या वर्गवारीतच नोंदवली गेली आहे. एअर क्वालिटी इंडेक्सची आकडेवारी 0 ते 50 या दरम्यान असली की ती चांगली समजली जाते. 51 ते 100 ही वर्गवारी समाधानकारक या सदरात मोडते. 101 ते 200 या दरम्यानची वर्गवारी मॉडरेट समजली जाते. 201 ते 300 ची वर्गवारी वाईट आणि 301 ते 400 ही वर्गवारी खराब या सदरात मोडते.
दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी जोराचा वारा अपेक्षित आहे, त्यामुळे रविवारपासून शहरातील हवेच्या प्रदूषणात बऱ्यापैकी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. हवा प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा आणि सरकारी कार्यालये अद्याप बंदच असून वाहनांवरील निर्बंधही कायम आहेत.