नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडल आहे. ऐन दिवाळीच्या काळात सर्वच महाग असल्याने दिवाळी साजरी करणं कठिण झालं आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने देशवासियांना दिलासा दिला असून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे.
मोदी सरकारने अनुक्रमे पेट्रोलवरील कर पाच रुपयांनी तर डिझेलवरील कर १० रुपयांनी घटवला आहे. त्यामुळे पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे. उद्यापासून नवीन दर लागू होणार आहेत.
On eve of #Diwali, Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow pic.twitter.com/peYP1fA4gO
— ANI (@ANI) November 3, 2021
इंधन दरवाढीचे सत्र मागील अनेक सुरू आहे. गेल्या तीन आठवड्यांत पेट्रोल 5 रूपयांनी, तर महिनाभरात डिझेल जवळपास 7 रूपयांनी महागले होते.