नांदेड – नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपविरुद्ध बाजी मारली. महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार असलेले जितेश अंतापूरकर विजयी झाले.
देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी झाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदार संघातील पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
या निवडणुकीला पंढरपूरप्रमाणेच महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र पंढरपूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीला शह दिला होता. आता मात्र महाविकास आघाडीने पंढरपूरमधील पराभवाचा बदल घेतला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक चव्हाण तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावली होती. त्यामुळे येथील लढत अप्रत्यक्षरित्य दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्येच होती. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली होती.
अखेरीच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळवला. तर भाजपचे सुभाष साबणे यांचा पराभव झाला. वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले तिसऱ्या स्थानावर होती.