पिंपरी – हिंजवडी नगरपरिषद झाल्यास पिंपरी महापालिकेत नव्याने समावेश प्रस्तावित असलेल्या 7 गावांपैकी केवळ 4 गावे हिंजवडी नगरपरिषदेत समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबत नुकतीच नगरविकास मंत्र्यांकडे प्राथमिक चर्चा झाली आहे.
संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडून अहवाल मागविला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून एकूण 7 गावे समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. त्यापैकी 4 गावे हिंजवडी नगरपरिषदेत समाविष्ट झाल्यास उर्वरित तीनच गावे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होऊ शकतील.