यंदा दिवाळीत फुटणार ‘सुरांचे फटाके’; खास दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस घेऊन येणार चाहत्यांसाठी नवीन गाणं

मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणाची सर्व जण उत्साहात तयारी करताना दिसत आहेत. त्यातच यंदाच्या दिवाळीत सुरांचे फटाके सुटणार असल्याचे दिसत आहे. कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महालक्ष्मीच्या आरतीच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्या हे गाणे रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे. याबाबतची माहिती अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे. अमृता यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर करत या गाण्याची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत या गाण्यात सोनू निगम असल्याची माहिती अमृता यांनी दिली आहे.

महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असे या आरतीचे नाव आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृता यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीत सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील त्या बेधडकपणे वक्तव्य करतात. अमृता या बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोल केल्याचे देखील दिसून आले आहे. अमृता यांना अगोदरच्या अनेक गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामाना करावा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.