पुणे (प्रतिनिधी) – भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात २२ ऑक्टोबरला सकाळी सहाच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडला.
सतीश उत्तमराव गायकवाड (वय ४०, रा. कटकेवाडी, हवेली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी शारदा गायकवाड (वय ३५) यांनी लोणीवंâद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सतीश २२ ऑक्टोबरला सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून कामाला निघाले होते. त्यावेळी वाघोलीतील आयव्ही इस्टेट फाटा परिसरात अज्ञात वाहनचालकाने सतीश यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करीत आहेत.