मुंबई – कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स रेखाटणाऱ्या के. लक्ष्मण यांची आज 100 वी जयंती आहे. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण घराघरात सर्वांपर्यंत पोहचले. राजकीय, त्यावेळी असलेली सामाजिक परिस्थीती यावर त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून वास्तव अगदी सध्या पण तितक्याच ताकदीने मांडले.
टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आर. के. लक्ष्मण यांचं ‘यू सेड इट’ या नावाने कार्टून प्रसिद्ध होत असे. 1951 मध्ये त्यांनी टाईम्स ऑफ इंडियात या व्यंगचित्र मालिकेला सुरुवात केली होती.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आर के लक्ष्मण यांचा अभिमानाने उल्लेख करत. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आपल्या भाषणात आर के लक्ष्मण यांचा उल्लेख करतात.
आर. के. लक्ष्मण यांना 1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित,1984 साली मॅगसेसे पुरस्काराने गौरव तर 2005 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे झाला. लक्ष्मण यांचे पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे होते. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते.
तर त्यांचा मोठा भाऊ आर. के नारायण प्रसिध्द लेखक आहेत. आर. के नारायण यांनीच आर. के. लक्ष्मण यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले. 1950 पासून आर के लक्ष्मण यांनी सुरू केलेली कार्टून कला उतारवयातही सुरु होती. उतारवयातही त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. अखेर 26 जानेवारी 2015 रोजी हा कुंचला कायमचा थांबला.