पुणे – प्रसिध्द उद्योगपतीस 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखा युनिट एकने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून बीएमडब्ल्यू कार आणी मोबाईल हस्तगत करण्यात आला. संतोष कपुरचंद राठोड (48 रा-शुक्रवार पेठ, शाहु चौक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री शनिवार पेठ पुणे येथील ऑफीसमध्ये आरोपी बांधकाम व्यवसायीक रुपेश ज्ञनोबा चौधरी ( रा – सहकारनगर) ,इस्टेट एजंट संतोष राठोड व इतरांनी आपसात संगनमत करुन शहरातील सुप्रसिध्द उदयोगपतीस गाठले. त्यांना त्यांचे ग्रुपमधील एका कंपनीने डी. एच. एल. एफ, यांच्या कडून घेतलेल्या 68 कोटी रुपये कर्ज प्रकरणात आयकर विभागाने ऑबजेक्शन घेतले आहे. त्यामध्ये ईडी व एस. एफ. आय. ओ. यांनी त्रुटी काढलेल्या आहेत असे चित्र निर्माण केले. त्यांनी प्रकरण मिटवुन देतो असे सांगुन 50 लाख रुपयांची मागणी (खंडणी) केली. पैसे दिले नाहीतर तुम्हाला सोडणार नाही बघुन घेईन अशी गंभीर धमकी दिली. त्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यापुर्वी गुन्हयामध्ये 8 ऑक्टोबर रोजी रुपेश ज्ञानोबा चौधरी (43 रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यास अटक करण्यात आलेली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्हयामध्ये आरोपींनी गुन्हाचे वेळी वापरलेली एक बीएमडब्ल्यु कार व मोबाईल फोन असा साठ लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
दरम्यान , पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अशोक माने व शाशिकांत दरेकर यांना संशयीत आरोपी संतोष राठोड हा त्याचे नातेवाईकास भेटण्यासाठी घोरपडे पेठेत येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून संतोष कपुरचंद राठोड यास पकडण्यात आले.
ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, विजेसिंग वसावे , अशोक माने , शशिकांत दरेकर, अमोल पवार पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत.