पुणे- गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या कमी होत आहे. सोमवारी 125 नव्या बाधितांची नोंद झाली असून, 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील एक पुणे हद्दीबाहेरील आहे.
एकूण बाधितांमधील सक्रीय बाधितांची संख्या वाढली असून, सध्या ती 1,524 आहे. त्यातील 219 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 192 जण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 5,550 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत.