मुंबई – जिच्या उदरातून आपला जन्म झालेला आहे, प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई, जी माऊली फक्त आपल्याला जन्मच देत नाही, तर वेळ आली तर आपल्या मुलांसाठी जीवाच रान सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही.
अशाच एका अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी चक्क स्वःताचा पाय कापला आहे. याबाबत संपूर्ण वृत्त असे की,’ यूकेच्या विस्बेकमध्ये राहणारी २८ वर्षीय कॅथलीन ओसबोर्न हिला तिच्या गरोदर पणात कळले कि तिच्या पायात गाठ आली आहे. या गाठीबाबत तपासणी केली असता हि गाठ कॅन्सरची आहे असे तिला डॉक्टरांनी सांगितले
पुढे तिला डॉक्टरांनी सल्ला दिला की, ती तिच्या पोटातील मुलाला जन्म न देता म्हणजेच अबॉर्शन करुन, केमो थेरपी घेऊ शकते, अन्यथा तिला तिचा पाय कापावा लागेल. यावर तिने मुलाला वाचविण्यासाठी स्वःताचा पाय कापून घेतला. तिचा पाय गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात कापला गेला आणि मार्चमध्ये तिने प्रीमॅच्योर बाळाला जन्म दिला. तिने याबाबत पत्रकरांशी बोलतांना सांगितले कि मला माझ्या मुलांसोबत राहायचे आहे. मी जो पर्यंत आहे मला त्यांचा सोबत वेळ घालवून छान आठवणी बनवायच्या आहेत. म्हणून मी हा निर्णय घेतला.