पुणे – एका घरमालकाने मोलकरणीच्या गरीबीचा फायदा घेत, तीच्या सोबत शारीरीक संबंध ठेवले. हे संबंध ठेवल्याचे छुपे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. मोलकरणीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर हे चित्रीकरण तीच्या पतीच्या व्हॉटस अप नंबरवर पाठवण्यात आले. याप्रकरणी घरमालकाविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हीम्मतसिंग धीमान (रा.सैनिकवाडी, वडगाव शेरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय मोलकरणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत महिला घरकाम करण्यासाठी धीमान यांच्या घरी येते. त्याने तीच्या गरीबीचा फायदा उठवत तीच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यानंतर संबंधाची नकळत व्हिडिओ क्लिप बनवली. ही क्लिप तीला दाखवत कोणाला काही एक सांगू नको मी तुझ्या सोबत लग्न करतो, तुझ्या दोन मुलांना संभाळतो असे आमिष दाखवले. तीने नकार दिल्यावर मात्र चित्रीकरणाची क्लिप पतीच्या व्हॉटस अप नंबरवर पाठवली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख करत आहेत.