शिक्रापूर – येथे रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथे नुकतीच शिवसेना मेळावा संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे बोलत होते, या प्रसंगी हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर, युवा सेना जिल्हा प्रमुख मच्छिंद्र सातव, शिवसेना महीला शिरूर तालुकाध्यक्ष चेतनाताई ढमढेरे, शिवसेना उपतालुका प्रमुख रोहिदास शिवले, आनंदा हजारे, युवा सेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बोलताना शिरूर तालुक्यातील आगामी निवडणुका लढविण्याचे ध्येय समोर ठेवून पक्ष वाढीसाठी आम्ही योगदान देत असून त्या साठी सदर मेळावा आयोजित करण्यात आलेला असून आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी तालुक्यातील अडचणी पक्ष श्रेष्ठींकडे मांडत महविकास आघाडीतील शिरूर हवेली मतदार संघातील खदखद आम्ही पक्षाकडे मांडणार आहे, तसेच बैलगाडा शर्यती संदर्भात सध्या कोणी काहीही म्हणत असेल मात्र त्या संदर्भातील सर्वच कामे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले आहे असे यावेळी शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांनी सांगितले.