पुणे – भरधाव “पीएमपीएमएल’ बसच्या धडकेत सायकलस्वार अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर परिसरातील थोरवे चौकात शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
चंदा परमार (16) असे मृत मुलीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. जखमी चंदाला ससून रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासणीअंती मृत घोषित केले. नातेवाईक दाखल झाल्यावरच तिच्यासंदर्भात माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.