मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी केवळ नारायण राणे एवढं बोलताच राज ठाकरे यांनी त्याला मध्येच तोडत “ए चल बस्स…” अशी प्रतिक्रिया दिली आणि ते पत्रकार परिषदेतून निघून गेले. त्यांचा या प्रतिक्रियेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. अनेक जण प्रतिक्रियेमुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढत आहे.
दरम्यान, पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांना खोचक सल्ला दिला होता. मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत; परंतु जातीयवाद विषयावर मी जे मत मांडले त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकाशी काय संबंध, हे मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावून सांगावे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या
माझे वक्तव्य – प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा संबंध काय? – राज ठाकरे
राष्ट्रवादीने महाराष्ट्रात जातीचं विष पेरलं, दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करु नये