नवी दिल्ली – बलात्कारातील आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यासाठी दिल्ली पोलीसमधील एका महिला सब इन्स्पेक्टरने अनोखी शक्कल लढवली. आरोपीसोबत मैत्री करून त्याला अटक करण्यात त्यांनी यश मिळवलं.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी महिला सब इन्स्पेक्टरने आरोपीला सोशल मीडियावर ट्रॅक केलं. त्यानंतर त्याच्यासोबत मैत्री केली आणि त्याला भेटण्यास बोलवलं. त्यानंतर त्याला अटक केली.
तत्पूर्वी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सब-इन्स्पेक्टर प्रियंका सैनीने तपास केला. त्यानंतर फेसबुकवर आरोपीचा तपास सुरू केला. त्यानुसार एक नवीन फेसबुक प्रोफाईल तयारी केली आणि आरोपीला रिक्वेस्ट पाठवली.
दरम्यान आरोपीसोबत चॅटींग करून चांगली मैत्री केली. त्यानंतर प्रियंका सैनी यांनी आरोपीला एका रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास बोलवलं. त्यावेळी आरोपी आला नाही. ३१ जुलै रोजी आरोपीने भेटण्यासाठीचे ठिकाण अनेकदा बदललं. मात्र अखेरीस आरोपीला श्री माता मंदिर महावीर इन्क्लेव येथून अटक कऱण्यात यश आलं.
अटक केल्यानंतर आरोपीने सांगितलं की, तो द्वारका येथे बांगड्यांच्या दुकाणात काम करतो. मागील दीड वर्षात त्याने अनेक मुलींवर अत्याचार केल्याचंही सांगितलं.