मोरगाव – अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव येथे आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे मंदिर बंद असले चथुर्तीची वारी वाया जाऊ नये म्हणून पायरी व शिखर दर्शनासाठी भक्त मयुरेश्वर मंदिर परीसरात आले होते.
आज अंगारकीच्या निमित्ताने पहाटे पाच व सकाळी सात वाजता श्रींची पुजा करण्यात आली. यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला. आजची चतुर्थी केल्याने बारा चतुर्थीचे पुण्य मिळते अशी आख्यायिका असल्याने गणेश सांप्रदायीक मंडळीच्या घरातील प्रत्येक सदस्य या चतुर्थीचे वृत करतो.
आज पेठेतील सर्व दुकाने हार दुर्वा श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती. सकाळी सात वाजता धूपारतीच्या वेळेस फरसावर शेकडो भक्तांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे राज्य शासनाने मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला असल्याने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असलेले मयुरेश्वर मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी बंद आहे.
मात्र चतुर्थीची वारी वाया जाऊ नये म्हणून गणेश भक्त पायरी व शिखर दर्शनासाठी आलेले आढळुन येत होते.
“शासनाने सर्व दुकाने, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे . मात्र मंदिराबाबत निर्णय घेतला जात नाही. गणेश भक्त श्रींच्या दर्शनासाठी आसुसलेले असल्याची प्रतीक्रीया बारामती येथील भक्ताने व्यक्त केली.” – गणेश भक्त